'सुरुची'त बाप्पांचे आगमन; वेदांतिकाराजेंनी जागविली उत्सवाची आठवण

'सुरुची'त बाप्पांचे आगमन; वेदांतिकाराजेंनी जागविली उत्सवाची आठवण
shivendra raje bhosale

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले shivendra raje bhosale यांच्या घरी दरवर्षी प्रमाणे पर्यावरणपूरक आणि साध्या पद्धतीने गणपतीचे आगमन झाले. काेराेनाचे जगावरील संकट टळू देत अशी प्रार्थना केल्याचे आमदार भाेसलेंनी नमूद केले. यावेळी वेदांतिकाराजे भाेसले यांनी सुरुची बंगला येथे आजही पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाची परंपरा जाेपासत असल्याचे नमूद करीत नागरिकांनी उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी हाेऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. ganeshotsav-2021-shivendrasinhraje-bhosale-satara-trending-news

साताऱ्यातील "सुरुची" या त्यांच्या निवासस्थानी शिवेंद्रराजे यांचे पुत्र रुद्रनीलराजे यांच्या हस्ते चांदीची मूर्ती आणून त्याचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर गणपती बाप्पाची आरती करून जगावरचे कोरोनाेचे विघ्न गणपती बाप्पाने घालवावे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

shivendra raje bhosale
प्रेमप्रकरण : शिवतेज घाटगेचा काढला काटा; गावात तणाव

वेदांतिकाराजे म्हणाल्या वर्षानुवर्ष सुरुची बंगला येथे गणेशाेत्सव काळात गणरायाची स्थापना केली जाते. पर्यावरणपूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर केला जात नाही. (कै.) अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी ही गणेशाची मुर्ती बनवली हाेती. त्याचीच आजही प्रतिष्ठापना केली जाते. काेणत्याही प्रकारे निसर्गाला हानी हाेऊ नये याची आम्ही काळजी घेत असताे. खरंतर ही परंपरा महाराष्ट्राची पुर्वीच्या काळापासूनची आहे. पुर्वी गणाेबा (मातीचा गणपती) बसविला जायचा. त्यानंतर प्लॅस्टर आॅफ पॅरीस आले आणि पर्यावरणाला हानी पाेहचली. नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा असे आवाहनही साै. भाेसले यांनी केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com