Ganpati Onboard Godavari Express : गोदावरी एक्सप्रेसमध्ये बाप्पा विराजमान, सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास झुंबड

ganesh chaturthi 2023 : आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना भाविक करीत गेली अनेक वर्ष प्रवास करीत आहे.
Godavari Express Ganeshotsav
Godavari Express Ganeshotsavsaam tv

- अजय साेनवणे

Nashik Ganpati Utsav : देवा हाे देवा गणपती देवा..., तू सुखकर्ता... असे विविध सूर आज प्रवाशांच्या कानी पडत हाेते अन् प्रवासी भक्तीभावाने आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत हाेते. गेल्या 27 वर्षांपासून असलेली परंपरा मनमाड- मुंबई प्रवास करणाऱ्यांनी आजही गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करुन जाेपासली. (Maharashtra News)

Godavari Express Ganeshotsav
Kanda Lilav : उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद : व्यापा-यांचा निर्णय

दररोज असंख्य प्रवाशांची सेवा करणा-या गाेदावारी एक्सप्रेसमधील गणेशोत्सवाची (Godavari Express) ख्याती आता राज्यभर पसरली आहे. त्यामुळे या रेल्वे गाडीने दहा दिवस प्रवास करण्यासाठी देशातील अनेक गणेशभक्त आतूर असतात. यंदा देखील गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेशाेत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

Godavari Express Ganeshotsav
Konkan Tourism : काेकणातील पर्यटनासाठी 'हाऊसबाेट' ची संकल्पना; गुहागरच्या युवकाची कल्पकता (पाहा व्हिडिओ)

या गाडीच्या एका बोगीत सर्वधर्मीयांच्या माध्यमातून रात्री आर्कषक फुलांची सजावट करण्यात आली. आज मनमाड स्थानक आणि परिसर बाप्पामय होऊन गेला आहे. रेल्वेत बाप्पांचा गजर करत दररोजचा प्रवास सुखाचा व्हावा अशी अनेकांनी प्रार्थना केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com