
Maharashtra Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाला आजपासून (मंगळवार) धूमधडाक्यात प्रारंभ झाला आहे. राज्यभरात गणेशभक्तांनी पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणले. घरोघरी बाप्पांची विधीवत पुजा आणि प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. दरम्यान उत्सवानिमित्त राज्यातील सर्वच बाजारपेठेत हार, फुले, मिठाई आदी साहित्यांसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी आहे. (Maharashtra News)
अमरावतीत फुलांचा भाव वधारला
अमरावती येथे फुलांच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. दहा दिवस बाप्पांची पूजा अर्चा करण्यासाठी फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. उत्सवाला सुरुवात होताच फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत.
काही दिवसांपूर्आवी झेंडूचे फुले चाळीस रुपये किलो अशी मिळत हाेती. आज झेंडूच्या फुलांचा दर वधारला हाेता. प्रतिकिलाे 100 ते 120 रुपये अशी मिळत हाेती, गुलाब 300 ते 350 रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे.
कोल्हापूरकरांचा उत्साह शिगेला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरकर सकाळ पासूनच शाहूपुरी कुंभार गल्ली ,बापट कॅम्प, पापाची तीकटी या परिसरात मोठी गर्दी केली आहे. ढोल ताशाच्या गजरात आणि कोल्हापुरी हलगीच्या ठेक्यात गणपती बाप्पाचा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत.
नाशकात ढाेल ताशांचा गजर
नाशिक येथे सकाळपासून घरोघरी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. बाजारपेठेत लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली हाेती. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात नाशिककर लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात हाेते.
पावसामुळे त्रेधा
दरम्यान नाशिक शहरात साेमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ उडाली. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स आहेत. या ठिकाणी पावसामुळे दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले.
रायगड, सातारा, अकाेला, पुणे, मुंबई यासह काेकणात गणेशाेत्सवाची धूम पाहयला मिळत आहे. ठिकठिकाणी बच्चे कंपनीसह सार्वजिनक गणेशाेत्सव मंडळाचे कार्यकर्ते लाडक्या बाप्पाचा गजर करत आपआपल्या घरी, मंडळांत गणरायाला नेत आहेत. बाप्पांना घरी नेत असतानाच बच्चे कंपनी लाडक्या बाप्पाचे आवडते खाद्य माेदक आर्वजुन घेताना ठिकठिकाणी दिसत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.