
- सागर निकवाडे
Nandurbar Ganesh Utsav : नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील विविध भागात लाडक्या बाप्पाच्या स्वागत मिरवणुकांना प्रारंभ झाला आहे. बाप्पांचे आगमन झाल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. (Maharashtra News)
उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव असलेल्या मानाचे दादा, बाबा, काका, मामा, तात्या या गणपतीची स्थापना माेठ्या दिमाखात आज (ganesh chaturthi) झाली. याबराेबरच विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणरायाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत.
शहरात आज सकाळपासूनच भक्तीपूर्ण वातावरण दिसून येत असून मानाच्या गणपतीच्या स्थापनेनंतर शहरातील इतर मंडळांनी मिरवणुका काढून लाडक्या बाप्पाची स्थापना केली. शहरातील मानाच्या गणपती मंडळांना 140 वर्षाची परंपरा आहे. या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गर्दी हाेत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.