नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी गजाआड!

कमी वयात जास्त पैसा मिळवण्याच्या मोहापायी आपण अनेकांना वाईट संगती किंवा अडचणीत सापडलेल्या पाहिला असेल. तर सामान्य नागरिकांच्या याच लोभाचा फायदा उचलत नागपूर मध्ये एक टोळी सक्रिय होती.
नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी गजाआड!
नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी गजाआड!मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर: कमी वयात जास्त पैसा मिळवण्याच्या मोहापायी आपण अनेकांना वाईट संगती किंवा अडचणीत सापडलेल्या पाहिला असेल. तर सामान्य नागरिकांच्या याच लोभाचा फायदा उचलत नागपूर मध्ये एक टोळी सक्रिय होती. नोटा दुप्पट करण्याची कला अवगत असल्याचा दावा करून अनेकांना कंगाल करणाऱ्या टोळीने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे. या टोळीतील दोन सदस्यांना नागपुरातील पारडी पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर मधील मार्डी भागात राहणाऱ्या व्यक्तीसोबत अशीच एक गंमत घडली आहे. पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवत या टोळीने चार लाखाचा त्यांना गंडा घातला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील पहा-

असे होते लुबाडत;

टोळीचे मुख्यालय पश्चिम बंगालमध्ये परगणा जिल्ह्यात आहे. सुरुवातीला व्यवसायात चांगलं जम असलेल्या सोबत या टोळीचे सदस्य व्यवसायिक संबंध निर्माण करतात. एक दोन व्यवहार झाल्यानंतर रक्कम दुप्पट करून देण्याचे जाळे टाकत, पाचशेच्या दोन चार नोटा हातचलाखीने दुप्पट करूनही दाखवत. त्यामुळे विश्वास बसल्याने अनेक जण स्वतः सोबतच ओळखीच्या व्यक्तीच्या लाखो रुपये दुप्पट करून घेण्यासाठी या भामट्यांना घरी बोलवत. त्यांच्याकडच्या लाखोच्या नोटा ताब्यात घेत भामटे लक्ष विचलित करत. व रोकड पिशवीत टाकतात आणि गरम पाण्यात नोटासारखे दिसणारे कागदाचे बंडल टाकून त्यावर विशिष्ट रसायन टाकत आणि पाण्याचा रंग बदलल्या नंतर तीन ते चार तासानंतर रक्कम काढून घ्या अशी थाप मारून पसार होत असे.

नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी गजाआड!
Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!

पोलिसांच्या हाती लागले तर त्यांचेच वकील सोडवण्यासाठी;

देशातील विविध प्रांतात अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्यानंतर हे भामटे त्यांच्या घरी काही दिवसासाठी मुक्कामाला जातात. चुकून शहरातील पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्यांना तिथल्या तिथे सोडून घेण्यासाठी त्यांची वकील मंडळी सज्ज असायची. कोर्टात जामीन मिळाला नाही तर पोलिसांनी आरोपीच्या पाठोपाठ वकील मंडळी संबंधित शहरात पोहोचत असे. लाखोची रक्कम हाती लागल्यामुळे झटपट पळून जाण्यासाठी ते कधी विमानाच्या तर कधी खासगी वाहनांचा वापर करत असत.

नागपूरहून शाहू आणि डायरी नाम व्यापाऱ्याकडून चार लाख लुटल्यानंतर पश्चिम बंगाल मध्ये पळून जाण्यासाठी या टोळीने नागपूर ते बिलासपूर साठी वीस हजाराची आलिशान टॅक्सी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांचा मार चुकवितात पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये सुमित घोष आणि इद्रीस खान हे दोन आरोपी सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com