
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (salim khan) यांना काही दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने धमकी दिली होती. सलमान जॉगिंगला गेल्यावर ज्या ठिकाणी विश्रांती घेतो, तेथील एका बाकावर धमकीचे सलमानला धमकीचे पत्र (Threat Letter) मिळाले होते. त्यानंतर सिनेविश्वात एकच खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरानंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. दरम्यान, सलमानला धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा पर्दापाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि सलीम खान यांना धमकी देणारा इसम हा कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार असल्याचं पोलिसात तपासात समोर आलं आहे. विक्रम ब्रार असं सलमानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. विक्रम ब्रार हा राजस्थानचा गुंड असून त्याच्यावर २४ हून अधिक गुन्हे दाखल असून तो राजस्थानचा रहिवासी आहे. दरम्यान, विक्रम ब्रार हा देशाबाहेर असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्येही सलमान खानला जीवे मारण्याचा कट गॅंगस्टर बिष्णोईने रचला होता. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्याची सुपारी संपत नेहरा नावाच्या व्यक्तीला दिली होती. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्यावेळी लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचला असल्याची तपासात उघड झाले होते. लॉरेन्सने खुलासा केला होता की,सलमान खानला मारण्यासाठी राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सांगितले होते. त्यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला होता. संपतने मुंबईतील सलमान खानच्या घराची रेकी केली. पण तो सलमान खानपर्यंत पोहोचू शकला नाही.
त्यानंतर संपत नेहराने आपल्या गावातील दिनेश फौजी मार्फत आरके स्प्रिंग रायफल मागवली. स्प्रिंग रायफल लॉरेन्स बिश्नोई याने त्याच्या ओळखीच्या अनिल पंड्याकडून ३ ते ४ लाखांना विकत घेतली होती. त्यानंतर ती रायफल दिनेश फौजीकडे ठेवली. पण पोलिसांनी या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेवून रायफल शोधून काढली आणि संपत नेहराला अटक केली.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.