मातीपासून नव्हे; चक्क पेन्सिल पासून साकारली गणपती बाप्पाची मुर्ती!

एकही पेन्सिल न चिकटवता तब्बल पंचवीस हजार पेन्सिल पासून अनोखा पेन्सिल बाप्पा साकाराला आहे.
मातीपासून नव्हे; चक्क पेन्सिल पासून साकारली गणपती बाप्पाची मुर्ती!
मातीपासून नव्हे; चक्क पेन्सिल पासून साकारली गणपती बाप्पाची मुर्ती! अॅड. जयेश गावंडे

अकोला : आजपर्यांत आपण मातीने बनवलेले गणपती पाहिले आहेत मात्र एका दिव्यांग व्यक्तीने चक्क पेन्सिल (Pencil) पासून गणपती बनवला असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे एकही पेन्सिल न चिकटवता तब्बल पंचवीस हजार पेन्सिल पासून अनोखा पेन्सिल बाप्पा साकाराला आहे. अकोल्यातील मनकर्ण प्लॉट येथील गणपती सध्या चर्चेचा विषय बनलाय त्याला कारण ही तसेच आहे कारण ही गणेश मुर्ती मातीची नसून पेन्सिलपासून बनवली आहे.(Ganpati idol made from pencil)

ही गणेशमुर्ती जवळपास 25 हजार पेन्सिल पासून बनवली आहे अकोल्यातील (Akola) एका पायाने दिव्यांग असणारे टिल्लू टावरी यांनी ही मुर्ती साकारली आहे. ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती साकारत असतात. यावर्षी त्यांनी 'पेन्सिल बाप्पा' साकाराला आहे. हा गणपती भगतसिंग गणेश मंडळाने बसवला आहे. विशेष म्हणजे या गणपतीसाठी लावण्यात आलेल्या पेन्सिल ह्या कुठल्याही प्रकारे न चिटकवता लावण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपासून हा गणपती बनवण्यासाठी टिल्लू टावरी यांनी मेहनत घेतली होती वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिलचा वापर करून त्यांनी हा गणपती साकारला असून या पेन्सिल एका कंपनीकडून घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

मातीपासून नव्हे; चक्क पेन्सिल पासून साकारली गणपती बाप्पाची मुर्ती!
...तो माझ्यावर अ‍ॅसिड फेकणार होता!; अभिनेत्री अक्षरा सिंहचा धक्कादायक खुलासा

हा गणपती भक्तांच्या दर्शनसाठी खुला करण्यात आला आहे. वीर भगतसिंग मंडळासाठी टिल्लू टावरी हे दरवर्षी काही ना नवीन मुर्ती बनवत असतात. अनेक दिवसाच्या कालावधी नंतर आज पेन्सिलचा बाप्पा विराजमान झाल्यानंतर भक्त पेन्सिलच्या बाप्पाला पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत तर हा बाप्पा सध्या अकोल्यात कुतूहलाचा विषय बनला आहे. टिल्लू टावरी हे दिव्यांग असताना देखील त्यांच्यामधील कल्पकता या पेन्सिलच्या बाप्पाच्या मूर्तीत अवतरली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com