Ganpati Special : सांगलीतील 'या' मस्जिदीत गेल्या ४० वर्षांपासून बसवला जातो गणपती!

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; सांगलीतील गोटखिंडी येथील मस्जिदमध्ये गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम
Ganpati Special : सांगलीतील 'या' मस्जिदीत गेल्या ४० वर्षांपासून बसवला जातो गणपती!
Ganpati Special : सांगलीतील 'या' मस्जिदीत गेल्या ४० वर्षांपासून बसवला जातो गणपती!विजय पाटील

सांगली : हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील मस्जिद मधील गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा आज ही कायम आहे. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेल्या चाळीस वर्षांपासून हिंदू मुस्लिम बंधू एकत्र येऊन मस्जिद मध्ये गणपती बसवत आहेत.

हे देखील पहा :

न्यू गणेश तरुण मंडळाने, 1981 साली पहिल्यांदा गणपती बसवायची परंपरा सुरु केली. मात्र, त्यावेळी पाऊस आल्याने मूर्ती मस्जिद मध्ये बसवण्यात आली. तेव्हा पासून आज पर्यंत गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत मस्जिद मध्ये गणपती बसवत आहेत. तर या दरम्यान गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजा आला तर एका मस्जिद मधेच गणपती आणि मोहरम सन एकत्र साजरा करतात.

Ganpati Special : सांगलीतील 'या' मस्जिदीत गेल्या ४० वर्षांपासून बसवला जातो गणपती!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

तर चाळीस वर्षांपासून गणेश उत्सव मध्ये मुस्लिम बांधव कोणत्याही प्रकारे माउंसाहार करत नाहीत. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये एक्याचे दर्शन घडते आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या  सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com