साताऱ्यात गौरी-गणपतीची अनोखी सजावट; 'आत्मनिर्भर स्त्री'चा साकारला देखावा

कोरोनामुळे माणसाची जगण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तसाच बदल शिक्षण पद्धतीत सुद्धा झाला आहे.
साताऱ्यात गौरी-गणपतीची अनोखी सजावट;  'आत्मनिर्भर स्त्री'चा साकारला देखावा
साताऱ्यात गौरी-गणपतीची अनोखी सजावट; 'आत्मनिर्भर स्त्री'चा साकारला देखावा ओंकार कदम

सातारा: साताऱ्यातील देसाई कुटुंबीयांनी आत्मनिर्भर स्त्री ची अनोखी सजावट केली आहे. गौरी-गणपतीच्या सजावटीतून घरकाम करणाऱ्या सामान्य स्त्री पासून लॅपटॉप वर ऑनलाइन शिक्षण आणि काम करणाऱ्या आत्मनिर्भर स्त्री चा प्रवास साकारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे माणसाची जगण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तसाच बदल शिक्षण पद्धतीत सुद्धा झाला आहे.

पूर्वी मुलांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप आले की पालक त्यांना ओरडायचे परंतु आता शिक्षण पद्धतीच ऑनलाइन झाल्याने मोबाईल, लॅपटॉप शिवाय मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत. या सर्व गोष्टी गौरी-गणपतीच्या सजावटीमध्ये मांडून सध्याच्या बदलत चाललेल्या शिक्षण पद्धती आणि त्यातून आत्मनिर्भर झालेली स्त्री असा प्रवास सजावटीच्या माध्यमातून साताऱ्यातील सदरबाझर परिसरात राहणाऱ्या देसाई कुटुंबियांनी मांडला आहे.

साताऱ्यात गौरी-गणपतीची अनोखी सजावट;  'आत्मनिर्भर स्त्री'चा साकारला देखावा
14 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

या सजावटीच्या माध्यमातून साताऱ्यातील देसाई कुटुंबियांनी अगदी थोडक्यात आणि मोजक्याच शब्दात बदललेल्या शिक्षण पद्धतीवर प्रकाशझोत टाकत या शिक्षण पद्धती बरोबर स्त्री कशी आत्मनिर्भर झाली आहे याबाबत मांडणी केली आहे.अगदी घरकाम करणारी स्त्री,शिवणकाम करणारी स्त्री ते आता लॅपटॉप वर शिक्षण व काम करणारी आजची स्त्री असा सध्याच्या स्त्री चा प्रवास या माध्यमातून दाखवला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com