Gautami Patil Surname: पाटील नाही तर कातील कसली; गौतमीच्या आडनावावरून नवा वाद, खरं आडनाव काय?

Gautami Patil Surname Controversy: गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून गौतमी आणि कार्यक्रमातील राडा यासह वाद यांचं एक वेगळं समिकरणच बनलं आहे.
Gautami Patil Surname
Gautami Patil SurnameSaam TV

Gautami Patil News: गौतमी तिच्या नृत्याने नेहमीच चर्चेत असते. अशात तिच्या नावासमोर सबसे कातील गौतमी पाटील हमकास लावलं जातं. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून गौतमी आणि तिच्या कार्यक्रमातील राडा यासह वाद यांचं एक वेगळं समिकरणच बनलं आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी राडा करूनये यासाठी आता कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देखील केला जातो. अशात आता सातत्याने वादाच्या विळख्यात असलेली गौतमी पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. (Latets Gautami Patil News)

Gautami Patil Surname
Who is Ghanshyam Darode : Gautami Patil ला इशारा देणारा Ghanshyam Darode नेमका कोण?

गौतमीचं आडनाव खोटं...?

गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप, मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. काल पुण्यात गौतमीच्या आडनावावरून एक बैठक पार पडली. यावेळी तिचं आडनाव पाटीन नसून चाबुकस्वार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

" गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरू नये. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.

Gautami Patil Surname
Gautami Patil Lavani Show: सबसे कातिल गौतमी पाटील येणार विरारमध्ये; इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

अशात गुरुवारी सायंकाळी ७ वाजता विरारमध्ये गौतमीचा एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी गौतमी पत्रकारांशी संवाद साधेल असं म्हटलं जात आहे. त्यावेळी पाटील या आडनावावरून झालेल्या वादावर तिचं मत काय आहे हे समजण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com