नागपूरमध्ये खळबळ! रेल्वे स्थानकात सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

नागपूर रेल्वे स्थानकात एका बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेनं एकच खळबळ उडाली.त्यानंतर बॉम्ब स्कॉड पथक नागपूर रेल्वे स्थानकावर तातडीनं पोहोचले.
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

नागपूर : नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर काल ५४ स्फोटकांच्या कांड्या सापडल्या होत्या, त्यामुळे नागपूर पोलीस अलर्टवर आहे. नागपूर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीनं स्फोटकं ठेवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. नागपूर रेल्वे स्थानकात एका बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या आढल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बॉम्ब स्कॉड पथक नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur railway station) तातडीनं पोहोचले. बॉम्ब शोधक पथकाने (Bomb Squad) बॅगेची तपसणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्या सापडल्या. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने जिलेटीन कांड्या निकामी केल्या.

हे देखील पाहा -

अशाप्रकारची स्फोटकं नक्षलवादी वापरतात, त्यामुळे या स्फोटकांची नक्षल लिंकही पोलीस तपासत आहेत. दरम्यान यावर आता नागूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, घातपाती शक्यता वाटत नाही, काही गोष्टी तपासात पुढं आले आहे, पण तपास सुरू असल्याने सध्या अधिक काही सांगता येणार नाही असे देखील त्यांनी सांगितले.

Nagpur News
Satara Breaking News: युवकाचा गळा चिरुन खून; घटनास्थळी जमली गर्दी

“स्फोटकं फार घातक नव्हते, फटाक्यासारख्या कांड्या होत्या. पण हे स्फोटकं कशासाठी ठेवले होते याचा काय उद्देश होता? याचा तपास सुरु आहे. नागपूर पोलीस सध्या अलर्टवर आहेत अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी संघ मुख्यालयाची रेकी जैश ए मोहम्मद ने केली होती, त्याचा या स्फोटकांशी काही संबंध नाही असंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com