भ्रष्टाचार लपवण्यासाठी पालिकेस लावली आग; काॅंग्रेसचा आराेप

भ्रष्टाचार लपवण्यासाठी पालिकेस लावली आग; काॅंग्रेसचा आराेप
fire

चंद्रपूर : शहरापासून सुमारे २० किलाेमीटर अंतरावर असलेल्या घुग्गुस येथील नव्यानेच निर्माण झालेल्या पालिकेच्या इमारतीस आज (बुधवार) सकाळी अचानक आग fire लागली. इमारत परिसरातील गोदामाला अचानक लागलेल्या आगीत गोदामातील साहित्य खाक झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु गोदामवजा इमारतीत ग्रामपंचायतीशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज व एका कथित विद्युत भ्रष्टाचाराशी संबंधित विजेचे साहित्य हाेते आणि ते जाळण्यात आल्याचा आरोप हाेऊ लागला आहे.

दरम्यान ही आग लागल्याचे समजताच शहराच्या आसपासच्या उद्योगातील अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी ही आग आटाेक्यात आणली. त्यापुर्वी ही आग विझविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली.

fire
सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही आग मुद्दाम लावल्याचा आरोप काँग्रेस नेते सय्यद अन्वर व कार्यकर्त्यानी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार विद्युत भ्रष्टाचाराशी संबंधित विजेचे साहित्य तेथे हाेते आणि ते जाळण्यात आले आहे.

पालिकेच्या प्रथम मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी वीज भ्रष्टाचार प्रकरण व संशयित आग दोन्हीची चौकशी होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. विशेष म्हणजे या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचा एकही कॅमेरा आग लागलेल्या स्थळावर केंद्रित नाही.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com