कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाचे मराठवाड्याला गिफ्ट?

कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाचे मराठवाड्याला गिफ्ट?
railway

अहमदनगर ः साईबाबांची शिर्डी, मराठवाडा व दक्षिण भारत रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनी (ता.17 सप्टेंबर) कोपरगाव ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता जाहीर करावी. या नियोजित रेल्वेमार्गामुळे दाक्षिणात्य भाविकांचा रेल्वेप्रवासाचा खर्च व वेळ वाचेल.

मराठवाड्याचा काही भाग व कोपरगावच्या पूर्वभागाच्या विकासाला चालना मिळेल. आपण या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांना दिली. मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यास मराठवाड्यासाठी ते अनोखे गिफ्ट ठरेल.

ते म्हणाले, कोपरगावातील रहिवाशांना रेल्वेने प्रवास करताना औरंगाबाद अथवा नांदेड येथे जाण्यासाठी मनमाडला जावे लागते. कोपरगाव-रोटेगाव रेल्वेमार्ग झाल्यास कोपरगाव-मनमाड-औरंगाबाद या मार्गावरील जास्तीचे एकूण 94 किलोमीटर अंतर कमी होईल. प्रवाशांचा वेळ व खर्च वाचेल. या रेल्वेमार्गामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच मराठवाड्याच्या सीमेवरील वैजापूर तालुक्यातील ब-याच दुष्काळी गावांना फायदा होईल. Gift of Kopargaon-Rotegaon railway line to marathwada abn79

railway
कुत्रं भुकलं तर दगड मारावाच लागतो...

या मार्गावरच उक्कडगाव रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. त्यातून या परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळेल. तसेच मुंबई-पुणे–नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक तारांकित चौकोन तयार होईल. औरंगाबादवरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या कोपरगाववरून शिर्डीकडे वळविता येतील.

कोपरगाव ते रोटेगाव या रेल्वेमार्गाची मागणी फार जुनी आहे. मराठवाड्यातील नेत्यांनी त्यासाठी यापूर्वी आंदोलने केली. साईबाबांच्या शिर्डीचे महत्व लक्षात घेऊन प्रवासी संघटनेनेदेखील ही मागणी लावून धरली. आपण यात लक्ष घातले आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सरकार दरबारचा प्रस्ताव मार्गी लागल्यास पुढील पाठपूरावा सुरू करता येईल.Gift of Kopargaon-Rotegaon railway line to marathwada abn79

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com