
जालन्यात अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटलं. यावेळी मराठा आंदोलकांशी बोलताना गिरीश महाजन यांनी गोड बातमी लवकर कळणार, असं मोठं वक्तव केलं आहे. (Latest Marathi News)
मराठा आंदोलकांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, 'कालच उपसमितीची बैठक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. पहिल्यांदा इतकी विस्तृत बैठक झाली. समितीचं काम ६०-७० टक्के झालंय. त्यांनी १ महिन्याचा अवधी मागितला आहे. ३ महिन्यात अहवाल न आल्यामुळे मुख्यमंत्री खूप चिडले होते'.
'आता समितीने सांगितलंय की, आम्ही १ महिन्यात अहवाल देऊ. या प्रकरणी कुणी कोर्टात जाऊ नये, याचा देखील तोडगा निघाला आहे. १ महिना सांगितला आहे, १५-२० दिवसांत देखील काम पूर्ण होईल. आम्हाला वाटलं जरांगे पाटील आमचं ऐकतील. आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे, असे ते म्हणाले.
'आम्ही दुसरे कामे बाजूला ठेवून आरक्षणाच्या विषयावर बैठका घेत आहे. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा माफी मागितली आहे. गोड बातमी लवकर कळणार आहे,असं वक्तव्य महाजन यांनी केलं .
' आपण अंतिम टप्प्यात आलोय. माझी विनंती की, आपण उपोषण सोडून मुंबईला येऊन बसलात तर १० दिवसांत जीआर तुमच्या हातात यायला मदत होईल, असे महाजन पुढे म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.