खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? महाजनांच्या आरोपावर नाथाभाऊ संतापले; इतकं नीच राजकारण...

मी गिरीश महाजनांच्या मुलांवर काहीही बोललो नाही.
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam TV

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका संपायचं नाव घेत नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर खळबळजन आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? याचा तपास केला पाहिजे असं महाजन यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर मुलगा नसल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. यावर गिरीश महाजन यांनी म्हटलं की, खडसे माझ्या मुलाबाळांवर जात आहेत तर त्याच्या मुलाचा मृत्यू कसा झाला हे देखील तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोललो तर त्यांना झोंबेल, त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे भलं आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नाही. पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं, हा संशोधनाचा विषय आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. (Latest Marathi News)

Girish Mahajan Eknath Khadse
Beed : 'राज्यापालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा'; ठाकरे गटाने जाहीर केले बक्षीस

गिरीश महाजन यांच्या आरोपांवर बोलताना खडसे म्हणाले की, मी गिरीश महाजनांच्या मुलांवर काहीही बोललो नाही. दुर्दैवाने मी फक्त त्यांना मुलगा नाही, एवढंच म्हणालो. इतकं नीच आणि हलकट राजकारण मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही. गिरीश महाजनांच्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण त्याबाबत कधी उल्लेख केला नाही. अगदी फर्दापूरच्या रेस्टहाऊसला काय झालं हे त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये दिसतील.

मी काही आरोप करत नाही. पण माझ्या मुलाचं काय झालं हे माझ्यासाठी वेदनादायी आहे. या घटनेला दहा वर्ष झाली आहेत. मुलानं आत्महत्या केली तेव्हा घरात केवळ रक्षा खडसे होत्या. त्यामुळे त्यांचा रोख रक्षाताईंवर आहे का? असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला.

Girish Mahajan Eknath Khadse
काँग्रेसने भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काय केले? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत. मग अशा स्थितीत संशय कशाला घेता. तुमच्याकडे सत्ता आहे. नाथाभाऊंची तुम्ही अनेक प्रकरणात चौकशी केली आहे. याही प्रकरणात चौकशी करा. ईडी, सीबीआय, एसीबी चौकशी केली त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. म्हणून त्यांचा संताप अनावर होतो. मात्र मुलाच्याबाबत संशय असेल तर यंत्रणांचा वापर करुन तुम्ही चौकशी करा, मलाही त्याचा आनंद आहे, एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com