मूलगी झाली हाे! ऑईल टाकुन आईला दिलं पेटवून; नातेवाईकावर आराेप

मूलगी झाली हाे! ऑईल टाकुन आईला दिलं पेटवून; नातेवाईकावर आराेप
yavatmal crime news

- संजय राठाेड

यवतमाळ : बेटी बचाव बेटी पढावचा मोठा गाजावाजा झाला तरी मुलगी नकोच ही समाजातील बुरसटलेली मानसिकता अजूनही कायम आहे. अनेक ठिकाणी मुलगीच होऊ नये यासाठी प्रयत्न होतात. एखाद्या कुटुंबात मुलगी नकाेशी असेल आणि झालीच तर तिला किंवा तिच्या आईला मारून टाकण्याचे अमानुष कृत्य आजही होताना दिसत आहे. मानवी काळजावर डागण्या देणारी अन् मेंदु बधीर करणारी घटना यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथे नुकतीच उघडकीस आली आहे. (girl-child-born-woman-died-after-beating-yavatmal-crime-news-sml80)

माेनिका गणेश पवार या विवाहितेने आपल्या भावाला दिलेल्या माहितीनूसार तिला तिच्या एका नातेवाईकाने तेल ओतून जाळून टाकण्याचा प्रकार केल्याचे सांगितले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेत वनीता पवार यांचा बळी गेला आहे. yavatmal crime news

या घटनेची प्राथमिक माहिती अशी : माेनिका गणेश पवार यांनी चार जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म का दिला या कारणावरूनमाेनिकाशी नात्यातील एकाने वाद घालण्यास प्रारंभ केला. त्यातून काही वेेळेला भांडण ही झाले. माेनिका बाळंतपण असल्याने त्यांनी भांडणाकडे दुर्लक्ष केले. एकदा वनीता या बाथरूममध्ये गेल्या हाेत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर ऑईल टाकुन त्यांना पेटवून देण्यात आले.

दरम्यान जळालेल्या अवस्थेत वनीता यांना उपचारसाठी सेवाग्राम येथील दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी त्या 80 टक्के भाजल्याचे सांगण्यात आले. अखेर माेनिका यांची शनिवारी (ता.17) प्राणज्याेत मावळली.

yavatmal crime news
Chembur Live : दरड काेसळून 11 ठार; NDRF चे बचाव कार्य सुरु

दरम्यान ही घटना घडल्यानंतर माेनिका हिने आपल्या भावाशी साधलेल्या संवादातून तिने सासरकडील एका नातेवाईकाने मला मुलगी झाली म्हणून अंगावर ऑईल टाकवून पेटवून दिल्याचे सांगितले आहे.

आपल्या 14 दिवसीय मुलीस आणि एका चार वर्षाचा मुलास माेनिका साेडून गेल्याने तिच्या माहेरच्यांनी या घटनेची सविस्तर चाैकशी व्हावी यासाठी पाेलिसांत धाव घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com