Nagpur News: सोशल मीडियावर बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या; विष घेऊन संपवले जीवन

भेटायला न आल्यास सोशल मीडियावर बदनामी करू असे दोघेजण पीडितेला धमकावत होते.
Nagpur News
Nagpur NewsSaam TV

Nagpur News: सोशल मीडियावर प्रत्येकाला नवीन मित्र भेटतात. मात्र ही मैत्री काहींसाठी संकट घेऊन येते. हिंगणघाट येथे सोशल मीडियावर झालेली मैत्री एका तरुणीच्या जीवावर बेतली आहे. सोशल मीडियावर आम्ही तुझी बदनामी करू, अशा धमक्या तिला सातत्याने येत होत्या. या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दोन आरोपीं विरोधात हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सनी अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे नागपूर (Nagpur) शहरातील रहिवासी आहेत. या दोघांनी पीडित तरुणीशी फेसबूक (Facebook) मार्फत मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्सअॅप मार्फत ते एकमेकांशी बोलू लागले. काही दिवसांनी या दोघांनी पीडितेला भेटण्यास बोलावले. मात्र तरुणी त्यांना भेटायला जात नससल्याने त्यांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

Nagpur News
Nagpur | नागपुरात कर्नाटक सरकारचे पोस्टर्स, पाहा व्हिडीओ

भेटायला न आल्यास सोशल मीडियावर बदनामी करू असे दोघेजण पीडितेला धमकावत होते. रोज अशा धमक्या येत असल्याने तरुणीला हे असह्य झाले. रोजचा मानसीक त्रास होत असल्याने तिने स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिने हिंगणघाट येथील राहत्या घरी उंदिर मारण्याचे औषध घेतले. कुटुंबीयांना हे समजताच त्यांनी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले.

Nagpur News
Nagpur News: मोदींच्या हस्ते उद्घाटनाआधीच शिंदे-फडणवीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; समृद्धी महामार्गावरुन करणार एकत्र प्रवास

मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच नागपूर पोलिसांनी आदित्य आणि सनी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com