सज्ञान असतानाही केली बालविवाहाची कारवाई, वधुपित्याची पोलिसात धाव

जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथक व चाईल्ड लाईन या पथकांनी अक्षदा पडण्याअगोदरच दोन बाल विवाह रोखल्याचा दावा केला आहे.
सज्ञान असतानाही केली बालविवाहाची कारवाई, वधुपित्याची पोलिसात धाव
Jalna Chlid Marriage Saam TV

जालना: जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथक व चाईल्ड लाईन या पथकांनी अक्षदा पडण्याअगोदरच दोन बाल विवाह रोखल्याचा दावा केला आहे. जालना तालुक्यातील (Jalna District) गोंदेगाव व घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावात होणारे बाल विवाह पथकाने रोखल्याचा दावा पालकांनी खोडून काढत ही कारवाई खोटी असल्याचं दावा केला आहे. वधू वरासह पालकांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे.

जिल्ह्यातील गोंदेगावात १६, तर मच्छिंद्रनाथ चिंचोलीत १७ वर्षांच्या मुलीचा बाल विवाह (Child Marriage) बुधवारी होणार होणार होता अश्या महितीच्या आधारे पथकाने दोन वेगवेगळी टीम तयार करून या टीमने लग्न मंडपात जाऊन या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे म्हणत पथकाने मुलीच्या आई वडिलांना नोटीस देऊन हे बाल विवाह रोखल्याचा कारवाई केल्याचा दावा करण्यात आला.

Jalna Chlid Marriage
धोनी बाद होताच कोहलीने दिली शिवी; ट्वीटरवर चाहत्यांनी विराटला झापलं

दरम्यान हा बाल विवाह झाला नसून मुलगी सज्ञान असल्याचा दावा मुलीच्या आई वडील आणि मुलीने केल्याने एकच खबळ उडालीय, पथकाला शाळा सोडण्याचे प्रमाण पत्र दाखवून त्यावर असलेल्या जन्मतारखे नुसार आमची मुलगी सज्ञान असतांना ही या पथकाने कारवाई केल्याचा आरोप पालकांनी करत पथकाकडून केल्या गेलेल्या कारवाई विरोधात संताप व्यक्त करत सरळ पोलिस मुख्यालय गाठत वृत्तपत्रातून या पथकाने बदनामी केल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे बाल विवाह रोखणाऱ्या पथकांच्या कारवाईचे पितळ उघड पडले आहे.

बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथक व चाईल्ड लाईन या पथकांनी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात खोटी माहिती देऊन आणि फोटो छापून आपली पाठ थोपटून घेतल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. समाजात नाहक बदनामी झाल्याने पथका विरुद्ध तात्काळ कारवाई करावी व खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही पालकांनी केलीय, या घटनेमुळे वधूपित्या वरगातून संताप व्यक्त केल्या जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.