दिव्यांगाना हक्काचे घरकुल द्या; अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा
दिव्यांगाना घरकुल देण्यात यावे

दिव्यांगाना हक्काचे घरकुल द्या; अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा

पहिलेच कोरोना महामारीमुळे हाताचा रोजगार गमावलेल्या बेरोजगार दिव्यांगांपुढे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ऊभे राहिले होते

नांदेड : बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीकडुन राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध निवेदने देऊन आक्रमक आंदोलने- उपोषणे करुन तसेच मोर्चे काढुनही हक्काचे घरकुल मिळाले नसल्यामुळे नागनाथ कामजळगे आणि संजय सोनुले या दोन बेरोजगार दिव्यांगांनी महानगरपालिका नांदेडसमोर स्वताचे सरन रचुन अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

परंतु दक्षिण नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत हा अनुचित प्रकार थांबवत मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. तसेच दिव्यांगांना १५ दिवसांत हक्काचे घरकुल मिळाले नसल्यास मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले होते. आमदारांचा हा आक्रमक पवित्रा पाहता तसेच दिव्यांगांचा विद्रोह लक्षात घेता मनपा प्रशासनाकडून लेखी आश्वासन देत स्थानिक वर्तमानपत्रात घरकुलांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु परत ये रे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे मनपा प्रशासनाने दिव्यांगांची दिशाभूल करत वेळ काढू धोरण अवलंबिले होते.

हेही वाचा - बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास बघता ग्राम पंचायत निवघा बा. यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगांव यांना रस्ता व नाल्या दुरुस्ती करण्यासाठी दोनवेळा लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीची मागणीसुद्धा करण्यात आली.

पहिलेच कोरोना महामारीमुळे हाताचा रोजगार गमावलेल्या बेरोजगार दिव्यांगांपुढे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ऊभे राहिले होते आणि यातच वाढती महागाई आणि दरमहा किरायाचे घरभाडे भरणे हा मोठा गंभीर प्रश्न दिव्यांगांपुढे येऊन ठेपला होता. लोकशाही मार्गाने विविध आंदोलने उपोषणे करूनही हक्काचे घरकुल मिळत नसल्याचा राग मनात धरून आता बेरोजगार दिव्यांग महिला हि आक्रमक पवित्रा घेत आपल्या लहान सहान मुलांना घेऊन महानगरपालिका नांदेड समोर ता. १४ जुलैपासुन बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे आणि या ऊपोषणादरम्यान दररोज एकाच वेळी अनेक प्रकारचे तिव्र स्वरुपाचे विद्रोही आंदोलन करणार असल्याचे निवेदन मनपा आयुक्तसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक वजीराबाद नांदेड यांना दिले आहे.

या निवेदनावर शोभाबाई शिंदे, प्रतिभा साळुंखे, कमलबाई आखाडे, मयुरी घुगे, शशिकला बाचेवार, रेणुका एडके, सुशिला बेरजे, चंदाबाई गिमेकर, वैष्णवी बाचेवार, सुनंदा कांबळे, लक्ष्मी वर्षेवार, मंजुळाबाई एरपरवार आणि मनिषा पारधे या बेरोजगार दिव्यांग महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या उपोषणाला न्याय मिळेपर्यंत जाहिर पाठिंब्यासह सर्व ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गुबरे आणि भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पळसकर यांनी म्हटले आहे. तर या हक्काच्या लढ्यात आमच्यासह जास्तीत जास्त बेरोजगार दिव्यांग बांधव आणि भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह आदींनी केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com