'40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं, आम्हाला फासावर द्या; मात्र आंदोलन सुरूच राहणार'

विलीनीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा निर्धार ST आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे आज एकही BUS आगाराबाहेर पडली नाही.
'40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं, आम्हाला फासावर द्या; मात्र आंदोलन सुरूच राहणार'
40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं, आम्हाला फासावर द्या; मात्र आंदोलन सुरूच राहणारSaam Tv

लातुर : 28 ऑक्टोबर पासून लातुर जिल्ह्यात (Latur District) सुरू असलेलं ST कर्मचाऱ्यांच आंदोलन अद्यापही सुरू आहे. विलीनीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा निर्धार आंदोलक ST कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे आज एकही बस आगाराबाहेर पडली नाही. राज्य शासनाने आमचा आवाज ऐकावा नाही तर आमचं निलंबन करा, फासावर द्या पण आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ST आंदोलकांचा (ST Agitators) आहे.

हे देखील पहा -

लातुर जिल्ह्यात लातुर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर असे पाच आगार असून त्यामध्ये 1 हजार 38 वाहक, 912 चालक, 531 कार्यशाळेत कर्मचारी आणि 360 प्रशासकीय कर्मचारी आहेत. त्यापैकी 2 हजार 183 वाहक आणि चालक कर्मचारी अद्यापही संपात आहेत तर 117 कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी प्रशासकीय आणि कार्यशाळेतील 541 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत वाहक, चालक (Carrier, Driver) कामावर नसल्याने एकही बस आगारा बाहेर पडली नसल्याने अद्यापही एटीची वाहतूक ठप्प झाली आहे.

40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं, आम्हाला फासावर द्या; मात्र आंदोलन सुरूच राहणार
शरद पवारांचा फोटो ट्विट करत, MIM खासदारांचा आघाडी सरकारला सवाल

दरम्यान आता जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. असा निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. आजपर्यंत चाळीस पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यावर शासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करून तसा शासकीय निर्णय जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com