औरंगाबादमध्ये आता कुठंही जा लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक !

औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही जा किंवा काहीही खरेदी करा. इतकंच नाही तर दारूच्या दुकानावर जरी गेले तरीही आता त्यासाठी लस घेतली असणं आवश्यक आहे.
औरंगाबादमध्ये आता कुठंही जा लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक !
औरंगाबादमध्ये आता कुठंही जा लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक ! Saam Tv

औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही जा किंवा काहीही खरेदी करा. इतकंच नाही तर दारूच्या दुकानावर जरी गेले तरीही आता त्यासाठी लस घेतली असणं आवश्यक आहे. राज्यातील कोविड लसीकरणाचे प्रमाण हे ७४ टक्के आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ६४ टक्के इतके आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. शिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद शहरात आता पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे घ्यायला जा किंवा दारू घ्यायला जा, इतकंच नाही तर हॉटेलमध्ये जेवायला जा, किंवा कुठं फिरायला जा, तिथं प्रत्येकाला लस घेतली की नाही हे सांगावं लागणार आहे. आणि तेव्हाच ग्राहकाला सेवा दिली जाणार आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ९ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकान, मॉल, मोठी-छोटी सर्वच दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या याठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे. बाजारात सर्व ठिकाणी ग्राहकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर २२ नोव्हेंबरनंतर प्रवाशी वाहतूक करणारी सर्व ऑटो, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने यांना लसीकरणाबाबत सूचना करण्यात आल्यात.

औरंगाबादमध्ये आता कुठंही जा लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक !
तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी कॅबिनेटची मंजूरी; शेतकरी आंदोलन सुरुच ठेवणार

त्यानंतर पुन्हा २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मेडीकल, सौंदर्य प्रसाधनांची उत्‍पादने करणाऱ्या कंपन्‍या, दुकाने, औषध निर्माते, कंपन्‍या, सर्व दवाखाने, ब्‍लडबॅंक, हॉटेल्स किराणा मालाची दुकाने ,बहु-उत्पादन विक्री दुकाने सर्व प्रकारची दुकाने आस्थापना, रेस्टॉरन्ट्स, भोजनालय, ढाबे, खानावळी आणि खाद्यसेवा देणाऱ्या सर्व दुकानांमध्ये मालकासह कर्मचारी लस घेतले असावेत आणि ग्राहकांनी किमान लसीचा एक तरी डोस घेतलेला असावा तेव्हाच त्यांना सेवा द्यावी अशा सूचना करण्यात आल्यात.

त्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विदेशी दारू दुकाने, वाईन, बिअर शॉपी, देशी दारु दुकानामध्ये लसीकरण प्रमाणपत्राशिवाय दारूची विक्री करता येणार नाही अशा सूचना करण्यात आल्या. हे आदेश २५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत मराठवाड्यातील लसीकरणाचा टक्का कमी असल्याने विभागीय आयुक्तांनीही सर्व जिल्हाधिकार्‍यांना लसीकरण वाढविण्यासंदर्भात पाऊल टाकावे तसा सूचना केल्या आहेत. औरंगाबाद पॅटर्नप्रमाणे इतरही जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com