...तर गाेव्यातील कॅसिनो बंद करु; संजय राऊत
sanjay raut

...तर गाेव्यातील कॅसिनो बंद करु; संजय राऊत

Summary

गोव्यात तृणमूल काॅंग्रेसचा उदय झाला आहे. गोव्यासाठी नवी पहाट आहे असे भासविले जात असले तर यापूर्वी गोव्यात कधी पहाट झाली नव्हती का? असा प्रश्‍न संजय राऊत यांनी केला आहे.

पणजी : यापुर्वी गोव्याच्या विधानसभा निवडणुका goa assembly election शिवसेना युती किंवा आघाडीबरोबर लढली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे यश मिळाले नाही. येत्या विधानसभेची निवडणुक शिवसेना स्वबळावर २५ जागांवर लढेल अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गोव्यात अस्मितेबरोबर बेरोजगारी , ड्रग्ज ,कॅसिनो याबाबत विद्यमान भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. गाेव्यात आमची सत्ता आल्यास येथे सुरु असलेले गैरप्रकार थांबवूच मात्र कॅसिनो देखील बंद करु असे राऊत यांनी स्पष्ट केले. goa-assembly-elections-2022-shiv-sena-to-go-solo-shut-casinos-if-elected-says-sanjay-raut-sml80

राऊत यांनी भाजपाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने गोव्याची ओळख अंमली पदार्थ, कॅसिनो, वेश्‍या व्यवसाय अशी केल्याची टीका केली. नियोजनाअभावी कोरोनामुळे येथे अनेकांचे येथे बळी गेले. शिवसेनेने काेविड काळात उत्तम कार्य केले आहे. गोव्यातील अनेक रुग्णांना मुंबईसह अनेक राज्यात उपचारासाठी नेले असे राऊत यांनी नमूद केले.

sanjay raut
स्मृती, आम्हांला तुझा खूप अभिमान वाटतो! सांगलीकरांचा जल्लाेष

गाेव्याच्या नेत्यांना पक्षांतराचा रोग

राजकारण हे चंचल आहे. कुठल्याही वेळी कुठलीही घटना राजकारणात घडू शकते. काल केलेले भाष्य उद्या असणार आहे की नाही, हे राजकारणात कुठलाच राजकीय पुढारी सांगू शकत नाही. मागच्या वेळी आपण महागठबंधन करणार असे विधान केले होते. काल आपण स्‍वबळावर निवडणूक लढविणार असे संकेत दिल्यामुळे भाजपाला याची पूर्ण कल्पना आहे.

गाेव्याचे हिताचे निर्णय घेऊ

दरम्यान महाराष्‍ट्र राज्यात सेनेचे सरकार नागरिकांना चांगले प्रशासन देत आहे. ते गोव्यातील जनता देखील पाहत आहे. जे गाेव्याचे हिताचे असेल ते आम्ही सत्तेत आल्यावर येथे देखील करु असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com