दीड वर्षानंतर बीडचे ग्रामदैवत असणारे खंडेश्वरी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले...

नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन होणार असल्याने भाविकात आनंद
बीड - दीड वर्षानंतर बीडचे ग्रामदैवत असणारे खंडेश्वरी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले...
बीड - दीड वर्षानंतर बीडचे ग्रामदैवत असणारे खंडेश्वरी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले...Saam Tv

बीड - शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या खंडेश्वरी मातेच्या नवरात्र यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. यावेळी देवीची पूजा करत सर्व शृंगार करण्यात आले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सवाची जय्यत तयारी केली असून मंदिर दर्शनासाठी खुले केल्यामुळे भाविकांमधून म्हणून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच दर्शन रांगांमध्ये कोरोणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे, मंदिर व्यवस्थापन समितीने सांगितले आहे.

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले मंदिर आज उघडल्यामुळे, देवीची पूजा करत घटस्थापना करण्यात आलीय. इथून पुढे नवरात्रीचे नऊ दिवस, विधिवत पूजा, नैवेद्य, काकड आरती, छबिना पालखी मिरवणूक आधी कार्यक्रम पार पडणार आहेत. भाविकांनी येत असताना कोरोना च्या नियमाचे पालन करावे. असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने केलं आहे.

हे देखील पहा -

बीड शहरातील खंडेश्वरी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यापूर्वी देखील मंदिर अस्तित्वात होते, जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली, त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुकामातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू माझ्या सोबत चल असं मेंढपाळ म्हणाला. मात्र मी तुझ्या पाठीमागे येते पण तू परत फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू परत फिरून पाहशील त्याच ठिकाणी मी राहील, असं मेंढपाळाला वचन दिलं.

मेंढपाळ चालत असताना देवी खरच आपल्या पाठीमागे आली का ? हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा वचनाचा भंग केला म्हणून देवी बीड शहराच्या उत्तरेस, त्याच ठिकाणी थांबली. देवीच रूप हे तांदूळ मय आहे. वचनभंग झालं आणि सेवेत खंड पडला म्हणून खंडेश्वरी असं नाव रुढ झालं. तेव्हापासून रेणुका मातेच जागृत ठाण निर्माण झालं. सुरुवातीला मंदिर लहान होतं, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून मंदिर समिती आणि भाविक भक्तांच्या देणगी मधून आज मोठ्या प्रमाणात मंदिराचा विकास झाला आहे. असं मंदिराचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी सांगितले.

बीड - दीड वर्षानंतर बीडचे ग्रामदैवत असणारे खंडेश्वरी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले...
पत्‍नीशी अनैतिक संबंध..दारू पाजली अन्‌ मंदिराजवळ नेत डोक्‍यात घातला घाव

प्रत्येक वर्षी खंडेश्वरी देवीच्या नवरात्रामध्ये मोठी यात्रा भरते. यात लाखो लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात, यावर्षी मंदिर दर्शनासाठी खुले केल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. बीड शहरातील खंडेश्वरी माता ही जागृत देवस्थान आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जिल्हाभरातून लोक दर्शनासाठी येत असतात. नवरात्र उत्सव हा देवीसाठी मोठा उत्सव असतो. या उत्सवात लाखो लोक दर्शन करून जातात. यावर्षी कोरोणाच्या संकटानंतर मंदिर प्रथमचं दर्शनासाठी खुले केल्यामुळे, मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. त्या अनुषंगाने मंदिर समितीने कोरोणाचे नियम पालन करून सर्वतोपरी तयारी केलेले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com