Gondia Fraud: फेसबुकवर मैत्री जमली.. परदेशातून 'बर्थडे गिफ्ट' पाठवण्याचे आमिष अन् गोंदियातील शिक्षिकेला १२ लाखाचा गंडा

Facebook Friend Fraud: आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
Wardha News
Wardha NewsSaam TV

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Goregaon Fraud News: फेसबुकवरील ओळख झालेल्या मित्राने वाढदिवसाचे महागडे गिफ्ट पाठवण्याचे सोंग करत एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये लुटल्याचा प्रकार गोरेगाव येथे घडला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या सविस्तर..

Wardha News
Scrub Typhus Disease in Washim: वाशिममध्ये 'स्क्रब टायफस'चा शिरकाव; आरोग्य विभाग हाय अलर्टवर, दुर्मिळ आजार होतो कसा?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित शिक्षिका गोरेगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचगावटोला येथे कार्यरत आहेत. जून २०२३ मध्ये त्या शिक्षिकेची मूळचा ब्राझीलचा असलेला व अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या जॅक्सन जेम्स या तरुणाशी फेसबूकवर मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो तुमचा पत्ता सांगा असे म्हणत शिक्षिकेकडून पत्ता मागविला व त्या पत्त्यावर गिफ्ट पाठविल्याचे नाटक केले.

पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट व नो-टे- ररिस्ट सर्टिफिकेटकरिता ७ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठविले.

Wardha News
Nanded Crime News: खळबळजनक! ५० लाखांची खंडणी न दिल्याने परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधले अन्...

त्यानंतर तरुणाने पुन्हा व्हॉट्सऍपवर मॅसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस पेड़ करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने १४ जून रोजी २ लाख ३० हजार व १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदर याने पाठविलेल्या अकाऊंटवर पाठविले. एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भांदवीच्या कलम ४२०, ३४ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com