
गोंदिया : पाणी पिण्यासाठी नाल्यात गेलेल्या 4 म्हशीचा तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाला. यात त्यांना विद्युत शॅाक लागल्याने मृत्यु झाल्याची घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्यातील पांढरी गावात शिव मंदिरजवळील नाल्यात घडली आहे. (gondia news Current in water due to broken electric wire)
पांढरी गावातील शेतकरी (Farmer) सुरजलाल येडे हे नेहमी प्रमाणे आपल्या म्हशी चराईसाठी घेऊन गेले होते. दरम्यान चराईनंतर म्हशींना पाणी पिण्याकरीता गावातील शिव मंदिराच्या मागे असलेल्या नाल्यामध्ये घेऊन गेले. नाल्याच्या वरून गेलेल्या जीवंत विघुत वायर तुटून पडल्याने पाण्यात विद्युत प्रवाह वाहु लागला होता. याचाच करंट लागल्याने चार म्हशीचा जागीच मृत्यु झाला.
भरपाईची मागणी
विद्युत प्रवाह चालू असलेली तार तुटून नाल्यात पडल्याने वाहत्या पाण्यातच करंट होता. हा करंट लागल्याने मृत्यु झाल्याचे बोलले जात आहे. याची माहिती स्थानिक तलाठ्यांना देण्यात आली असून पंचनामा सुरु आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने (MSEDCL) द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.