पत्नीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले; मात्र, पतीनं गमावला जीव; हृदयद्रावक घटना

पत्नीला वाचवले; पण पतीचा विजेचा शॉक लागून मृत्यू
पत्नीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले; मात्र, पतीनं गमावला जीव; हृदयद्रावक घटना
FarmerSaam tv

गोंदिया : शेतात काम करीत असलेल्या पत्नीला लागलेला विजेच्या शॉक लागला. यापासून वाचवायला गेलेल्या पतीचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यु (Death) झाल्याची घटना गोटाफोडी ग्रामंपचायत हद्दीतील भागी येथे घडली आहे. (gondia news Saved wife life But her husband died of electric shock)

Farmer
नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर केली हत्या

गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील भागी येथील राजकुमार सराटे (वय 48) असे मृतक शेतकरी (Farmer) पतीचे नाव आहे. राजकुमार सराटे हे आपल्या पत्नीसोबत हंगामी शेतीचे काम करीत होते. दरम्यान राजकुमार यांच्या पत्नीला विद्युत शॉक (Electric Shock) लागला. हे दृश्य बघताच राजकुमार पत्नीला वाचविण्यासाठी गेले असता पत्नी तर वाचली पण पती राजकुमार सराटे यांना जोरदार विद्युत शॉक लागल्याने त्याचा शेतातच मृत्यु झाला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.

मुलगा अजून लहान

देवरी पोलिसांनी पंचनामा केरीत देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. मयत शेतकऱ्याच्या घरी पत्नी व मुलगा असा परीवार असुन या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान, हंगामी शेतीच्या वेळेतच शेतकऱ्याचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com