Gondia News | रस्ता विचारणं पडलं महागात; वृद्ध महिलेचा रस्त्यावरच झाला अपघात

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव-कामठा रोडवरील कट्टीपार जवळील नवेगाव फाट्यावर एका ट्रकने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे.
Gondia news
Gondia news saam tv

Gondia News : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव-कामठा रोडवरील कट्टीपार जवळील नवेगाव फाट्यावर एका ट्रकने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. या अपघातने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीराबाई घनश्याम हरिणखेडे असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

Gondia news
Mumbai Fire Incident : मुंबईत अग्नितांडव! रे रोड परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल हरीणखेडे ( वय 21) ही आपल्या आजी मीराबाई हरिणखेडे सोबत आत्याच्या उमरी (मध्यप्रदेश) या गावावरून स्कुटी या दुचाकीने खुर्सीपारटोला स्वगावी परतत होत्या. मात्र, ते दोघे गावी जायचा रस्ता विसरले. त्यामुळे आमगाव कामठा मार्गावर नवेगाव फाट्याजवळ स्कुटी थांबवून आजी रस्ता विचारण्यासाठी उतरल्या. त्यावेळी आमगावकडून येणाऱ्या एका ट्रकने कोमलच्या आजीला जोरदार धडक दिली. ट्रक चालकाने दिल्यानंतर घटनास्थलावरून फरार झाला. मात्र, मीराबाई या वृद्ध महिलेला जबर धडक दिल्याने मीराबाई जागेवरच ठार झाल्या.

Gondia news
Rain Update : यवतमाळसह जालन्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतीचं मोठ नुकसान

दरम्यान, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. या लोकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करिता आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातानंतर कोमल हरिणखेडे हिच्या तक्रारीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहे आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com