नदीत नाव पलटली; दोन महिलांचा मृत्यू

नदीत नाव पलटली; दोन महिलांचा मृत्यू
Gondia
GondiaSaam tv

गोंदिया ः जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड अप्पर तहसील कार्यलय हद्दीतील घोनाडी गावाला लागुन असलेल्या गाढवी नदीत नाव पलटी झाली. यात बसलेल्‍या दोन महिला मजुरांचा पाण्यात बूडुन मृत्यू (Gondia News) झाल्याची घटना घडली आहे. (gondia news The boat capsized in the river Death of two women)

Gondia
कांदा बियाणे तीन लाख रुपये क्विंटल

आदिवासी नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त असलेल्या चिचगड अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील घोनाडी गावातील काही महिला व पुरूष मजुरी करुन नावेत बसुन घोनाडी गावी परत येत होते. या नावेचे संतुलन बिघडल्याने नदीत नाव पलटी होवून बुडाली. त्यात घोनाडी येथील रेखा विजय वाढई (वय 30) व मनिषा दिनु गुरनुले (वय 31) या महिलांचा बुडून म्रुत्यु (Death) झाला.

पोहता येणारे पडले बाहेर

नावेत एकुन 7 ते 8 लोक बसुन गावी कामावरुन परत येत होते. ज्या लोकाना पाण्यात पोहता आले त्यांनी स्वतःला वाचविले. परंतु रेखा व मनिषा यांना पोहता येत नसल्याने त्‍यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्‍यांना जीव गमवावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com