Malaria Viral: मलेरियाच 'डेंजरस'; गोंदियात दोन जणांचा बळी

Gondia News : मलेरियाच 'डेंजरस'; गोंदियात दोन जणांचा बळी, जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद
Malaria Viral
Malaria ViralSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया जिल्ह्यात सध्या विविध आजारांची साथ सुरू असून जिल्हावासी पार त्रासून गेले आहेत. त्यातच आता (Gondia) धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्याची नोंद झाली आहे. यावरून डेंग्यूपेक्षा मलेरियाच (Malaria) जास्त डेंजरस म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Live Marathi News)

Malaria Viral
Manoj Jarange Andolan : मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, कुणबी सेनेची मोठी मागणी

पावसाळा म्हटला म्हणजे आजारांना आमंत्रण देणारा कालावधी ठरत असतो. आतापर्यंत डोळ्यांची साथ सर्वत्र पसरलेली होती. हि साथ आटोक्यात आली असतानाच आता तापाच्या साथीने जिल्हा फणफणला आहे. यामध्ये व्हायरल, टायफॉईडचा ताप असतानाच मलेरियाच्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. गोंदिया शहरापुरतीच साथ नसून अवघ्या जिल्ह्यालाच डासांनी ग्रासून सोडले आहे. डासांपासून मलेरिया व डेंग्यूचा जास्त प्रमाणात धोका दिसून येतो. जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त जीवघेणा ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

Malaria Viral
Maratha Reservation: मनोज जरांगे त्यागणार पाणी आणि औषधी

२०२ रुग्णांची नोंद 

डेंग्यूच्या रुग्णांची साथ अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यात आता २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हावासीयांनी डासांपासून जास्त सावध राहणेच गरजेचे झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com