गोंदिया पोलीस दलाच्या ताफ्यात ४६ नव्या वाहनांचा समावेश
गोंदिया पोलीस दलाच्या ताफ्यात ४६ नव्या वाहनांचा समावेश अभिजीत घोरमारे

गोंदिया पोलीस दलाच्या ताफ्यात ४६ नव्या वाहनांचा समावेश

40 बोलेरो व 6 स्कार्पिओ कर अशी एकूण 46 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यामुळे गोंदिया पोलीस दल अधिक सक्षम होणार आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया - गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात सहकार्य करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतुन 40 बोलेरो व 6 स्कार्पिओ कर अशी एकूण 46 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यामुळे गोंदिया पोलीस दल अधिक सक्षम होणार आहे. Gondia police force includes 46 new vehicles

हे देखील पहा -

आज या वाहनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले. या नव्याकोऱ्या 46 वाहनांमुळे गोंदिया पोलिस विभागाला आणखी बळ मिळणार असून 46 वाहनांपैकी 21 वाहने हि प्रोजेक्ट डायल 112 करता वापरण्यात येणार आहेत.

गोंदिया पोलीस दलाच्या ताफ्यात ४६ नव्या वाहनांचा समावेश
अट्टल गुन्हेगारांच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून !

21 डायल 112 ही सेवा नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी व प्रतिक्षा वेळ कमी करण्यासाठी अंमलात आणण्यात आली आहे. प्रभावी पोलीस सेवेसाठी, वेळेवर अचुक आणि पूर्ण माहीती उपलब्ध करुन सार्वजनिक सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने देशातील प्रत्येक पोलीस विभाग कार्यालयात या प्रकारची हेल्पलाईन सेवा लवकरच सुरु होणार आहे. उर्वरीत 25 वाहने पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com