अपहरण केलेल्या मुलीची गोंदिया रेलवे पोलिसांकडून सुटका

हे प्रकरण शासकीय पोलिसांकडे वर्ग करण्यात आले
अपहरण केलेल्या मुलीची गोंदिया रेलवे पोलिसांकडून सुटका
अपहरण केलेल्या मुलीची गोंदिया रेलवे पोलिसांकडून सुटकाSaam Tv

गोंदिया - इंस्टाग्राम या सोशल मीडियावर Social Media ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिचे लैंगिक शोषण करून गोंडवाना एक्स्प्रेसने बिलासपूर Bilaspur येथून ग्वालियर येथे नेत असताना रेल्वे पोलिसांनी त्या 17 वर्षीय मुलीची सुटका गोंदिया रेल्वे पोलिसांनी Police केली आहे. हे प्रकरण शासकीय पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील पहा -

छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील 17 वर्षीय सोनमची मैत्री शामसोबत इंस्टाग्रामवर झाली. त्यानंतर त्यांची फोनवरून संवाद सुरू झाला. दोघांमध्ये प्रेम जुळले. याचाच फायदा घेत शाम आणि शैलेश यांनी बिलासपूर येथे जाऊन सोनमचे शारिरीक शोषण केले. त्यानंतर तिला विश्वासात घेत ग्वालियर येथे गोंडवाना एक्स्प्रेसने जात होते.

अपहरण केलेल्या मुलीची गोंदिया रेलवे पोलिसांकडून सुटका
रायगड जिल्ह्याचा 99.73 टक्के निकाल; जिल्ह्यात 99 विदयार्थी नापास

दरम्यान रेल्वेगाडीत गस्तीवर असलेल्या गोंदिया रेल्वे पोलिसांना तिघांवर संशय आल्याने त्यांनी त्या मुलीची विचारपूस केल्यावर हा संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी लगेच तिघांनाही ताब्यात घेतले आहे. शाम दिनानाथ आणि शैलेश देविदासयांच्याविरोधात अपहरणाचा तसेच लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण शासकीय पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com