ड्रायव्हरने दारूच्या नशेत तेरा महिन्याच्या मुलीच्या अंगावर घातला रोडरोलर!

जिया हिची आई मुलीला बाजुच्या घरातील महिलेकडे सोडून पाणतोडी करता गेली होती.
Roadroller
RoadrollerSaamTvNews

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल दलदलकुही गावामध्ये रस्त्याला गुळगुळीत करणाचे काम सुरू असताना रोडरोलर (Roadroller) खाली चिरडून एका चिमुरडीचा अंत झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रोडरोलरच्या ड्रायव्हरने दारूच्या नशेत तेरा महिन्याच्या मुलीच्या अंगावर रोडरोलर नेल्याने त्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पाहा :

जिया इंद्रपाल उइके असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. जिया हिची आई मुलीला बाजुच्या घरातील महिलेकडे सोडून पाणतोडी करता गेली असता, रस्त्याला गुळगुळीत करण्याचे काम सुरू असताना चिमुकली जिया ही रस्त्यावर आली. रोडरोलरच्या ड्रायव्हरने मागे न पाहता रोलरने चिमुकलीला चिरडले. याची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली असून पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. तर, 13 महिन्याच्या चिमुकलीच्या मृत्यूने उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com