Gondiya News: लेकीचं लग्न काही दिवसांवर, पत्रिका वाटण्यासाठी आई-वडील गावी निघाले; पण वाटेतच घडली भयानक घटना

Gondiya Accident: गोंदिया जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.
Gondiya Accident News
Gondiya Accident NewsSaam TV

Gondiya Accident News: सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. लाडक्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न असल्याने अनेकजण खरेदी करण्यासाठी तसंच लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी घराबाहेर पडत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला भरधाव बोलेरोने जोरदार धडक दिली. (Breaking Marathi News)

Gondiya Accident News
Nagpur Crime News: बारावीच्या विद्यार्थिनीशी फेसबुकवर ओळख; डिनरला सांगून लॉजवर नेलं, तरुणाने केलं भयानक कृत्य

या धडकेत नवऱ्या मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. मन सुन्न करणारी ही घटना सोमवारी दुपारीच २ वाजेच्या सुमारास तिरोडा तालुक्यातल्या पांजरा गावाजवळ घडली. नरेश बोपचे असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलीच्या वडिलांचे नाव आहे. तर वंदना बोपचे, असं जखमी झालेल्या आईचं नाव आहे. (Latest Marathi News)

घरात लग्नसमारंभाची तयारी सुरू असताना, दाम्पत्यावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील खूरखुडी येथील नरेश फागुराम बोपचे यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं.

Gondiya Accident News
Pune Crime News: बारामती हादरली! घरात एकटीच झोपली होती महिला; रात्री अचानक ४ जण घुसले अन्...

मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी ते आपल्या पत्नीसह दुचाकीवरून पाहुण्यांकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, खुरखुडीवरून पांजरा बस स्टॉप (Gondiya News) जवळून मौजा बीर्सी- तिरोडाकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही दूर फेकले गेले.

या भयानक अपघातात नरेश बोपचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी वंदना या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नरेश यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून वंदना यांना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल केले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com