कॅनॉलमध्ये बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत; नवनीतपूर परिसरात हळहळ

Gondiya : हितेश यशवंत भोयर (वय 14) असं मृत झालेल्या मुलाचं आहे
कॅनॉलमध्ये बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत; नवनीतपूर परिसरात हळहळ
Gondiya NewsSaam Tv

गोंदिया: गोंदिया (Gondiya) जिल्ह्यातल्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील नवनीतपूर (Navneetpur) गावात एक भयंकर घटना घडली. मित्रासोबत कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी (11 मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हितेश यशवंत भोयर (वय 14) असं मृत झालेल्या मुलाचं आहे. बचावपथकाच्या अथक प्रयत्नानंतर हितेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. (Gondiya Navneetpur Latest News)

Gondiya News
चोरट्यांनी उडविली बाळापूरकरांची झोप; हातात लाठ्या-काठ्या घेऊन नागरिकांचा पहारा

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारीच्या सुमारास हितेश आपल्या मित्रांसोबत गावानजीक असलेल्या कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हितेश वाहून जात असल्याचं पाहत त्यांनी गावात जाऊन आरडाओरड केली.

घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर गोंदियातील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर गुरूवारी (12 मे) हितेशचा मृतदेह सापडला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता मोरगांव अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. हितेशच्या अशा दुर्देवी मृत्युमुळे नवनीतपूर गावात शोककळा पसरली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.