कुलदीप बिसेनची हत्या? पाेलिस तपास सुरु आहे

कुलदीप बिसेनची हत्या? पाेलिस तपास सुरु आहे
kuldeep bisen gondiya news

गोंदिया : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गोंदिया gondiya news शहराजवळ असलेल्या कवलेवाडा जवळील रेल्वे क्राँसिंगजवळ आढळून आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. कुलदीप बिसेन असे या युवकाचे नाव असून वादातून त्याची हत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती गाेंदिया पाेलिसांनी दिली. (gondiya-youth-dead-body-found-near-kavlewadi-railway-crossing-crime-news)

कुलदीप हा एका ड्रायव्हींग स्कूलमध्ये काम करीत असे. तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. दरम्यान साेमवारी कुलदीपचा मृतदहे कवलेवाडा जवळील रेल्वे क्राॅसिंगजवळ आढळला.

कुलदीपची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. ही हत्या अँसिड टाकून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याने पोलिसांनी यावर अधिक बोलता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com