Anganwadi Sevika Strike: गोंदिया जिल्ह्यातील १८०५ अंगणवाड्या कुलूप बंद; चार दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण १८०५ अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.
Anganwadi Sevika,  Anganwadi Sevika Stirke
Anganwadi Sevika, Anganwadi Sevika Stirkesaam tv

Anganwadi Sevika Strike: गोंदियात आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन मागील चार दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीसेविका, मदतनीस सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण १८०५ अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. (Latest Anganwadi Sevika Strike News)

मानधनवाढ आणि इतर मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा संप किती दिवस चालणार याकडे संर्वांच लक्ष लागलं आहे. ऐनवेळी पोषण आहार बंद झाल्याने गरोदर माता,किशोरवयिन मूलं मूली यांना याचा त्राल सहन करावा लागत आहे.

Anganwadi Sevika,  Anganwadi Sevika Stirke
Anganwadi workers Strike : कोरोना काळात दिवस-रात्र कष्ट घेतले, त्याचं फळ काय मिळालं? अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार

कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे. या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या आहेत. बुधवारपर्यंत (ता. 22 फेब्रुवारी) केवळ आहार वाटप करणार असल्याचे सेविकांनी नमूद केले आहे.

Anganwadi Sevika,  Anganwadi Sevika Stirke
Anganwadi workers News : २, २०, ००० अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचं नववर्षाचं मोठं गिफ्ट

पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळते. गेली ४८ वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने अंगणवाडी ताईंचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन देऊन प्रजासत्ताकदिनाची तारीखही जाहीर केली होती. मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.आज या संपाचा चौथा दिवस आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मागन्या मान्य झालेल्या नाहीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com