Good News:वसमत येथील शिक्षकांच्या पुढाकारातून ११ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मदत

मी एक शिक्षक समाजाचे देणं लागतो या लोकोपयोगी भावनेतून वसमत तालूक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी लोकवर्गणी जमा केली. यावेळी जमा झालेल्या साडेचार लाख रुपयांचा लोकवर्गणीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात आले.
Good News:वसमत येथील शिक्षकांच्या पुढाकारातून ११ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मदत
वसमत येथील शिक्षकांनी मदत

पंजाब नवघरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी 'मी एक शिक्षक' समाजाचे देणे लागतो या उपक्रमांतर्गत तब्बल साडेचार लाख रुपये वर्गणी जमा करुन खरेदी केलेल्या ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी एक शिक्षक समाजाचे देणं लागतो या लोकोपयोगी भावनेतून वसमत तालूक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी लोकवर्गणी जमा केली. यावेळी जमा झालेल्या साडेचार लाख रुपयांचा लोकवर्गणीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात आले.

हेही वाचा - शाखा व्यवस्थापक यांची बदली झाल्याने मरखेलकरांच्या वतीने सत्कार

त्याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के, तहसीलदार अरविंद बोळगे, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, वसमत डॉक्टर असोशिएशनचे सचिव डॉ. निलेश डिग्रसे, गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांच्यासह सर्व शिक्षणविस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व केंद्रीय मुख्याध्यापक तालूकाभरातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पोटे यांनी केले तर आभार प्रदशन श्री. शर्मा यांनी केले

लिटील किंग इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षलागवड

शिक्षकांनी उभ्या केलेल्या मदतीतून तालुक्यातील प्रत्येक प्रा. आरोग्य उपकेंद्रास प्रत्येकी एक असे सात केंद्रास ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले. व उर्वरीत चार तात्काळ रुग्णासाठी ठेवण्यात आले आहे. यासाठी हट्टा, हयातनगर, टेंभुर्णी, गिरगाव, कुरुंदा, शिंदे पांग्रा,आरळ येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कोवीडच्या कार्यकाळात वसमत तालूक्यातील सर्व कर्मचारी, विशेषतः शिक्षकांनी केलेल्या कामगीरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा यांनी कौतूक केले. संगणापूर शाळेच्या विद्यार्थ्यांने कोरोना काळात बनवलेली स्वयंचलित सायकल आणि विविध प्रयोगाची पाहणी केली. शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मिशन एक लाख वृक्षलागवड उपक्रमाचेही अभिनंदन केले.

येथे क्लिक करा - 'ही' आहे जगातील सर्वात कमी उंचीची गाय

घनदाट वृक्षलागवड मोहीम आणि सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय शाळा कारखाना, बाभूळगाव, वाखारी, गिरगाव येथे भेट दिली असता तेथील रंगरंगोटी, स्वच्छता आणि वृक्षलागवड पाहून श्री. शर्मा यांनी कौतुक केले. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांच्या कामाचे मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा व तहसिलदार अरविंद बोलंगे यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com