विधायक : नांदेडच्या सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप

नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या सिडको शाखेचे वतीने वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्यात टोपी तर हिवाळ्यात कानपटी व मफलेर, टोपी यासह विविध कार्यक्रम आयोजित करुन वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तुसह शालेय शिक्षण साहित्य पाल्यांना देण्यात येत असते.
विधायक : नांदेडच्या सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप
वर्तमानपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप

नांदेड : पावसाळ्याच्या दिवसातही दैनंदिन अंक वाचकापर्यंत पोचविण्यासाठी राबराब राबणा-या वृत्तपत्र विक्रेते यांना वर्षांचे तिन्ही ऋुतूसारखेच काम करावे लागते. थंडी, ऊन व पावसाळा हे तिन्ही ऋुतू त्यांच्यासाठी अडचणीचे ठरतात मात्र त्यावर मात करत वर्तमानपत्र वेळेच्या आता ही मंडळी वाचकांपर्यंत पोचविते. सध्या पावसाळा सुरु असल्याने भिजत व आपल्या सायकलवर टांग टाकून अविरत ग्राहकांच्या सेवेत असतात. अशा या वर्तमानपत्र वितरकांना आधार म्हणून सिडको वर्तमानपत्र संघटनेच्या वतीने रेनकोटचे वाटप केले.

नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या सिडको शाखेचे वतीने वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्यात टोपी तर हिवाळ्यात कानपटी व मफलेर, टोपी यासह विविध कार्यक्रम आयोजित करुन वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तुसह शालेय शिक्षण साहित्य पाल्यांना देण्यात येत असते.

हेही वाचा - नांदेड : जिल्ह्यातील गहाळ झालेले आठ लाखाचे मोबाईल शोधले- स्थानिक गुन्हे शाखा

या वर्षी संघटनेचे माध्यमातून वृत्तपत्र विक्रेते यांना पावसाळ्यात मुख्य वितरकसह मुलांना देण्याचा सुचना संघटनेचे मार्गदर्शक तथा नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांनी व्यक्त करुन दाखविल्या. वृत्तपत्र विक्रेते यांनी संमती दिली व तात्काळ रेनकोट आणल्यानंतर सिडको येथील अंक वितरण केंद्रावर १३ जुलै रोजी सकाळी जेष्ठ विक्रेते रामनाथ दमकोंडवार, मदनसिंह चव्हाण, शेख सयोध्दीन व महिला वितरक वंदना लोणे यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक रमेश ठाकूर, सुरज गायकवाड, हणमंत काळे यांच्यासह अध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे यांच्या सह पदाधिकारी व वृत्तपत्रे विक्रेते यांच्या उपस्थीती होती. संघटनेच्या सहाय्याने गेल्या दोन वर्षांपासून सर्व सदस्य व पदाधिकारी यांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मास्क व सॅनिटायझर वाटप, अन्नदान, साखर व किराणा सामान व‌ सानुग्रह अनुदान ही रोख वाटप करण्यात आले असून पावसाळ्यात दिलेल्या रेनकोटमुळे संघटनेने वृत्तपत्र व पदाधिकारी विक्रेते यांच्याशी नाते निर्माण केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com