Education News: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती, 8 हजार 169 पदे भरली जाणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Rcruitment 2023
MPSC Rcruitment 2023Saamtv

Pune News: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत असून एमपीएसीकडून आत्तापर्यंतची सर्वात मोठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार जवळपास ८ हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे. (Latest Marathi News)

MPSC Rcruitment 2023
Jalgaon News: २४९ डिजिटल शाळांमध्‍ये अंधार; बिल थकल्‍याने वीज कनेक्शन कट

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावर ही परिक्षा होणार आहे.

MPSC Rcruitment 2023
Akola News: पदवीधर विधान परिषद निवडणुक; ‘आप’ने जाहीर केला उमेदवार

जाहिरातीनुसार, गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत दोन हजार पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात एमपीएससीने (MPSC) प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com