
बाप्पांच्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एक आनंदाची बातमी दिलीय. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते, यासाठी महाराष्ट्र् राज्य परिवहन मंडळाच्या विविध आगारातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत. कोल्हापूर आगार आणि ते पुणे दरम्यान १५ ते १८ सप्टेंबर या काळात गणेशोत्सवासाठी अतिरिक्त २२० बसेस सोडण्यात येत आहेत. गणेशोत्सवात पुणे ते कोल्हापूर या प्रवासादरम्यान प्रवाशी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. यासाठी अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. (Latest News On Maharashtra)
त्याचप्रमाणे या काळात महामंडळ कोकण ते मुंबईत दरम्यान २०० बसेस सोडणार आहे. या बसेसचा मार्ग कोकण, मुंबई, ठाणे असेल. तसेच कोल्हापूर, कणकवली, रत्नागिरी, सावंतवाडी,मालवण, सांगली, इस्लामपूर, आणि बेलगावी या ठिकाणांसाठी देखील अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोंकण वासियांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवाशासाठी मोफत बस सेवा देण्यात येणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एकूण ५७० एसटी बसेस मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिली. कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या चौकाचौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ होणार आहेत. कोल्हापूर ते पुणे दरम्यान सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त २२० बसेसविषयी माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
अतिरिक्त चालवणाऱ्या बसेस या स्वारगेट, पिंपरी, चिंचवड, निगडी आणि हिंजेवाडी बस स्थानकांवर थांबतील. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर प्रवाशांची खूप गर्दी होत असते. तसेच कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकांहून धावणाऱ्या अतिरिक्त बसेस इस्लामपूर, सांगली, गडहिंग्लज, मिरज, निपाणी, बेलगावी, गारोटी, अजारा, चंदनगड या बस स्थानकांवरदेखील थांबतील.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली असून एसटी महामंडळानं कोकणातील गणेश भक्तांसाठी अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. महामंडळानं १४ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडल्या आहेत. सदर बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर , तसेच खासगी बुकींग एजंट आणि त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे.
बस तिकीट येथे करता येथील बूक
सणासुदीच्या काळात बसेसमध्ये जागा मिळत नाहीत. सीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना अडचणी येत असतात. ऑनलाईन तिकीट बूक करत असतानाही बऱ्याचवेळेस तिकीट मिळत नाही. दरम्यान प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे. कारण एमएसआरटीसी (MSRTC) आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway Catering And Tourism Corporation)सामंजस्य करार केलाय.
या करारनुसार, प्रवाशी रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर जाऊन आपले तिकीट बूक करू शकतील. तसेच प्रवाशी मोबाईल अॅपच्या माध्यमातून सुद्धा आपले बस तिकीट मिळवू शकतात. तसेच https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आणि बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपव्दारे तिकीट बूक करता येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.