Good News : राज्यराणीचे दहा डब्बे नांदेड ते मनमाडदरम्यान प्रवाशांसाठी उघडणार

नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीकरिता हे दहा डब्बे लॉक करुन गाडी चालविण्याऐवजी हे डब्बे प्रवाशांकरिता फक्त नांदेड ते मनमाड दरम्यान उपलब्ध करुन दिले आहेत.
Good News : राज्यराणीचे दहा डब्बे नांदेड ते मनमाडदरम्यान प्रवाशांसाठी उघडणार
नांदेड ते मनमाड दरम्यान डब्बे उपलब्ध

नांदेड : राज्यराणी एक्सप्रेसचे दहा डब्बे प्रवाशांना मनमाडपर्यंत उपलब्ध झाले आहेत. गाडी संख्या ०७६११ नांदेड ते मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरु आहे. या गाडीतील १७ डब्यापैकी १० डब्बे हे नांदेड ते मनमाड दरम्यान लॉक करुनच आत्तापर्यंत ही गाडी धावत होती. १७ पैकी फक्त सात डब्बेच नांदेड- परभणी- जालना- औरंगाबाद येथील प्रवाशांकरिता नाशिक- कल्याण- ठाणे - मुंबईला जाण्यासाठी उपलब्ध होते. या लॉक केलेल्या १० डब्यांचा प्रवाशांना उपयोग होत नव्हता. हे डब्बे मनमाड ते मुंबई दरम्यानच्या प्रवाशांकरिता मध्य रेल्वे तर्फे उपलब्ध करण्यात येत होते. Good- News-Ten -coaches- Rajyarani- opened -for- passengers- between- Nanded- and -Manmad

नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीकरिता हे दहा डब्बे लॉक करुन गाडी चालविण्याऐवजी हे डब्बे प्रवाशांकरिता फक्त नांदेड ते मनमाड दरम्यान उपलब्ध करुन दिले आहेत. नांदेड विभागातून आता मनमाडपर्यंत आरक्षण करता येणार आहे. याचा प्रवाशांना मनमाड येथून धावणाऱ्या उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडण्याकरिता उपयोग होईल. तसेच याने शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांनाही या १० डब्यांचा उपयोग होईल. मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या गाड्याही पकडता येतील. परंतु या दहा डब्ब्यांत मनमाडच्या पुढे आरक्षण करता येणार नाही. हे दहा डब्बे पूर्वीप्रमाणेच मध्य रेल्वे तर्फे मनमाड आणि त्या पुढील रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकारिता पूर्वी प्रमाणेच राखीव असतील.

हेही वाचा - पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे; मोदींचा इशारा

गाडी संख्या ०७६७२ परभणी ते नांदेड सवारी गाडी (अनारक्षित) : पूर्वी ०७६६५ या क्रमांकाने परभणी ते नांदेड दरम्यान धावणारी सवारी गाडी ता. १८ जुलैपासून तिचा नंबर बदलून नवीन नंबर ०७६७२ नुसार परभणी ते नांदेड दरम्यान सुरु होत आहे. ही गाडी सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ही गाडी अनारक्षित असेल. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. या गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वीप्रमाणेच असतील.

तसेच गाडी संख्या ०७६९२ तांडूर ते परभणी एक्सप्रेस ता. १७ जुलैपासून पूर्वी प्रमाणेच तांडूर ते परभणी दरम्यान धावेल. ही गाडी काही काळ सिकंदराबाद ते तांडूर आणि नांदेड ते परभणी दरम्यान अंशतः रद्द होती, सिकंदराबाद- नांदेड अशी धावत होती.

गाडी संख्या ०७६९१ नांदेड ते तांडूर एक्सप्रेस ता. १६ जुलैपासून पूर्वीप्रमाणेच नांदेड ते तांडूर दरम्यान धावेल. ही गाडी काही काळ सिकंदराबाद ते तांडूर दरम्यान रद्द करण्यात आली होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com