गुगल मॅपचे 'यु-टर्न'! संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवच्या नावातही बदल

मॅपवर औरंगाबाद असे शोधल्यानंतर संभाजीनगर असे आपोआप रिझल्ट येत होते. मात्र आता गुगलने यु-टर्न घेतला असून पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद (Aurangabad) असे नाव कायम ठेवले आहे.
Google map
Google map saam tv

नवनीत तापडिया

औरंगाबाद : गुगल मॅपने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलले होते. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता न देताही गुगल मॅपने नावात बदल केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. गुगल मॅपमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव असे केले होते. मॅपवर औरंगाबाद असे शोधल्यानंतर संभाजीनगर असे आपोआप रिझल्ट येत होते. मात्र आता गुगलने यु-टर्न घेतला असून पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद (Aurangabad) असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे. गुगलने काही दिवसांसाठी हे नाव का बदलले होते, आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. ( Aurangabad News In Marathi)

Google map
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

केंद्र सरकारच्या मान्यतेआधीच गुगल मॅपने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव हे धाराशिव असा उल्लेख गुगल मॅपमध्ये केला होता. त्यामुळे औरंगाबादेत नव्या वादाला सुरूवात झाली होती. या गुगल मॅपच्या निर्णयाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला होता. गुगलवर औरंगाबाद सर्च केलं तर आपोआप संभाजीनगर आणि उस्मानाबाद सर्च केले तर धाराशिव असे रिझल्ट येत होते. त्यानंतर आता गुगलने सदर निर्णय बदलला आहे. आता गुगल मॅपमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद असे नाव दाखवण्यात येत आहे.

Google map
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ९ मराठी कलाकारांना पुरस्कार जाहीर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत औरंगाबाद शहराचे नामांतर करुन ते संभाजीनगर असे केले होते. त्याआधी ठाकरे सरकारनं आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यातलं राजकारण तापलं होतं. एकीकडे शिवसेना या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. नामांतराच्या या निर्णयाला एमआयएमचा तीव्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com