
Gopichand Padalkar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक टोळी आहे आणि तो आज ना उद्या संपेल अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. दरम्यान पडळकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील आपल्या मतदारसंघातील प्रश्न साेडवा अशी टिप्पणी केली आहे. विटा (सांगली) येथे माध्यमांशी पडळकरांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एनसीपीचा आणि नेत्यांचा समाचार घेतला. (Maharashtra News)
गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत केवळ स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि तो आजपर्यंत बदलला गेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही. हा पक्ष फुटणार नाही कारण तो आज ना उद्या संपणार आहे अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर (NCP) निशाणा साधला.
पडळकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले अजित पवार सांगतात आपण लाखाच्या मताने बारामती मधून निवडून येतो. जर तुम्ही लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील 44 गाव हे पाण्यापासून वंचित का आहेत ? असा सवाल पडळकरांनी केला आहे.
दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून (maharashtra) या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते याचा आधी विचार अजित पवारांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे त्यांनी बघावं असा टोलाही आमदार पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.