स्वत:च्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका : पडळकर

स्वत:च्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका : पडळकर
Gopichand Padalkar

सांगली : वेळ न दडवता इंपेरिकल डेटा गोळा केला असता आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण obc political reservation मिळाले असते असे मत गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी व्यक्त केले. त्यांनी आज (रविवार) सांगली येथील झरे गावात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडीच्या कारभाराच्या विराेधात सूर आळवला.

पडळकर म्हणाले महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठललेलं हे आता सिद्ध करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेणार नाही या राज्य सरकारच्या निर्णयास आम्हीही पाठींबा दिला. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सातत्याने कल्पना दिली हाेती. परंतु महाविकास आघाडी सरकारने याबाबत केंद्र सरकारच्या काेर्टात चेंडू टाकून सेन्ससचा डेटा की इंपेरिकल डेटा असा वाद निर्माण केला. खरंत वेळ न दवडता इंपेरिकल डेटा गोळा केला असता आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर आज ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले असते असे पडळकरांनी नमूद केले.

Gopichand Padalkar
सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

आता तरी कामाला लागा, स्वत:च्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका. लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा अन्यथा ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हांला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com