महाज्योती संस्थेला ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकले - आ. पडळकर

विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा विडा उचलला असल्याची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
महाज्योती संस्थेला ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकले - आ. पडळकर
महाज्योती संस्थेला ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकले - आ. पडळकरtwitter/@GopichandP_MLC

सांगली: विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे अशी गंभीर टीका भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे. (gopichand padalkar slams to vijay wadettiwar for mahajyoti trust)

हे देखील पहा -

विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो... चाळणी परिक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुर्ननियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे, ते सांगलीच्या झरे मध्ये बोलत होते. या मालिकेत आता MPSC - UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतोय. काल कुठलीही पुर्वसुचना न देता १३ सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परिक्षेचे आयोजन केले आहे.

महाज्योती संस्थेला ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकले - आ. पडळकर
'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल...

आता तीन दिवसांत विद्यार्थी येणार कधी परिक्षा देणार कधी, तर UPSC चे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची १० ऑक्टोबरला पूर्व परिक्षा आहे. तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत असंही पडळकर म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com