
Grampanchayat Elections 2022 : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्या मातोश्री हिराबाई (hirabai padalkar) या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या गावाच्या सरपंच पदासाठी त्यांनी नुकताच त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकर यांचे मूळ गाव असून गावातील बहुतांश नागरिकांनी गावच्या बैठकीत हिराबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड व्हावी असा निर्धार व्यक्त केला. पडळकरवाडीत आतापर्यंत बिनविरोध निवडणुका (election 2022) होत आलेत. यावेळी देखील बिनविरोध निवडणूक करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे.
दरम्यान आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई कुंडलिक पडळकर यांनी सरपंच पदासाठी काही गावकऱ्यांसोबत तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असल्याने या गावातुन अन्य कोण सरपंच (sarpanch) पदासाठी अर्ज भरताेय की हिराबाई पडळकर यांची निवड बिनविरोध होते का हे आता पाहवे लागणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.