Ravikant Tupkar News: शासनाने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने भरीव मदत द्यावी; रविकांत तुपकरांची मागणी

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात पावसाने कहर केला आहे.
Ravikant Tupkar News
Ravikant Tupkar NewsSaam Tv

Buldhana Ravikant Tupkar News: बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात पावसाने कहर केला आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे भीषण पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Ravikant Tupkar News
Mumbai-Pune Express Way Landslide: मुंबई पुणे एक्सप्रेसवरील दरड हटवण्याचे काम सुरू; वाहतूक धीम्या गतीने

संग्रामपूर (Sangrampur) व जळगाव जामोद तालुक्यात अंदाजे तब्बल एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मेल द्वारे निवेदन करून केली आहे.

रविकांत तुपकरांनी शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील कालखेड फाटा, पहूरपूर्णा, अकोला फाटा, दुर्गादैत्य, काथरखेड, पिंप्री, एकलारा, बावनबिर, निवाना, चांगेफळ, अकोली, रूधाना, वकाना यांसह अन्य गावात भेटी देवून पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. तसेच संग्रामपूर तहसीलदार योगेश्वरी टोपे यांची भेट घेत लवकरात लवकर पंचनामे करण्यासंदर्भात चर्चा केली. (Buldhana News)

Ravikant Tupkar News
Nashik Leopard Attack: रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणावर अचानक बिबट्याने मारली झडप; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO

... तर रोषाला सामोरे जावे लागेल

नुकसान होवून ४८ तास झाले तरी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी साधी पाहणी सुद्धा केली नाही. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सरकारला या नुकसानग्रस्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com