लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी, अन्यथा बेमुदत उपोषण

लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी लालपरी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे देण्यात आला
लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी, अन्यथा बेमुदत उपोषण
लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी, अन्यथा बेमुदत उपोषण Saam Tv

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून, लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी लालपरी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे. तर दुसरीकडे १७ संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीने लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर भत्ते आणि थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळी अगोदर देण्यात यावे, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळी अगोदर देण्यासंदर्भात लालपरी प्रशासनाकडे लालपरी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर दिवशी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

सध्या लालपरी महामंडळ दुर्देवाने लालपरी कर्मचा-यांच्या आत्महत्येच्या घटना सतत घडत आहेत. यामध्ये विशेषत: लालपरी महामंडळातील कमी पगार आणि त्यामधील अनियमितता यामुळे आत्महत्या केल्यामुळे मयत कर्मचा-यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन हृदयाला चटका लावणारी आहे. लालपरी कर्मचा-यांना अत्यंत कमी पगार असल्यामुळे त्यातच अनेक विभागात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन निव्वळ देय अत्यंत कमी होणार असल्याने दिपावली सारख्या मोठया सणामध्ये एवढया कमी पैशात सण साजरा करणे खूप जिकरीचे ठरणार आहे.

कारण अनेक कर्मचा-यांनी मुलभूत गरजा भागविण्याकरिता कर्ज काढले आहेत. तसेच घरभाडे, राशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण इतर कर्ज, उसणवारी या देणी असल्यामुळे दिवाळी सण साजरा करणे पगारात शक्य नाही. यामुळे लालपरी कर्मचा-यांचे वेतन आणि महागाई भत्ता थकबाकी, वार्षीक वेतन वाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे आवश्यक असल्याचे मुकेश तिगोटे यांनी यावेळी सांगितले आहे. रा. प. कर्मचा-यांना दिपावलीचा सण साजरा करण्यासाठी माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन १ नोव्हेंबर दिवशी दिवाळी अगोदर अदा करण्यात यावे.

लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी, अन्यथा बेमुदत उपोषण
Unlock: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आजपासून सुरू

तसेच एकतर्फी वेतनवाढ लागू करताना १ एप्रिल, २०१६ पासून शासनप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढीचा दर ३%, घरभाडे भत्ता ८, १६, २४% देण्याचे मान्य केले होते. परंतु, अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे शासनाप्रमाणे भत्ते देऊन थकबाकीची रक्कम एक रकमी दिपावली अगोदर देण्यात या विविध मागण्या करीता महाराष्ट्र लालपरी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर दिवशी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र लालपरी वर्कर्स कॉंग्रेस इंटक, महाराष्ट्र लालपरी कामगार संघटना, महाराष्ट्र लालपरी कामगार सेना, कास्ट्राईब लालपरी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण १७ संघटना सहभागी आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com