Maharashtra Politics : राज्यपालांनी निमंत्रण दिलं नव्हतं...; शिंदे फडणवीस सरकारवर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

यात त्यांनी राज्यपालांकडून सत्ता स्थापनेआधी कोणतही पत्र आलं नव्हतं असा दावा केला आहे.
Nana Patole News
Nana Patole NewsSaam TV

Nana Patole News : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. बंडखोरी केल्यावर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र हे सारकार घटनाबाह्य असल्याचा दावा विरोधक करत आहेत. सत्ता स्थापन केल्यापासून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. याच मुद्यावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक मोठा दावा केला आहे. यात त्यांनी राज्यपालांकडून सत्ता स्थापनेआधी कोणतही पत्र आलं नव्हतं असा दावा केला आहे. (Latest Political News)

माहितीच्या अधिकारातून नाना पटोले यांनी ही माहिती मिळवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. " माहितीचा अधिकार कायदयानुसार आम्हाला एक पत्र मिळालं आहे. यात सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून कोणतही निमंत्रण पत्र मिळालं नव्हतं, याची माहिती देणारं एक पत्र त्यांच्या कार्यालयातून मिळालं आहे. आम्ही सातत्याने हे सरकार असंविधानिक असल्याचं म्हटलं, अशात आता या बाबत माहिती अधिकार मार्फत आणखीन मोठी माहिती समोर आली आहे.", असं नाना पटोले म्हणाले.

Nana Patole News
Nana Patole : प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपले दुकान चालवायला...'

"शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसबासाठी बिनविरोध निवडणुकीची आठवण करून देत असतील तर मागील चार निवडणुकीत काय झालं? ते त्यांनी आठवलं पाहिजे. ", असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

Nana Patole News
राज्यात भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र,मविआत बिघाडी होणार?Nana Patole काय म्हणाले?

नुकतेच वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाली आहे. या युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी महविकास आघाडीबरोबर युती करण्याची मुळीच इच्छा नसल्याचे म्हटले. त्यावर नाना पटोले यांनी त्यांना देखील खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. " आमच्याकडे त्यांचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही काम नाही. आपलं दुकान चालवायला कोण काय बोलतात? आम्हाला सोयर सुतक नाही.", असं नाना पटोले म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com