Gram Panchayat Election Result 2022 : राष्ट्रवादीचा गजर; भाजपच्या हाती भाेपळा

राज्यातील ग्रामपंचयातींच्या निवडणुकांचे निकाल समजताच विविध पक्षातील कार्यकर्ते जल्लाेष करीत आहेत.
ncp , gram panchayat election result 2022 , nashik, kalvan
ncp , gram panchayat election result 2022 , nashik, kalvansaam tv

- अजय सोनवणे

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील विविध जिल्ह्यात रविवारी ग्रामपंचायतींसाठी (grampanchayat) मतदान झालं. आज सकाळी दहा पासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीचा एकेक निकाल समजताच उमेदवारांसह त्यांचे समर्थक जल्लाेष करीत आहेत. नाशिकच्या (nashik) कळवण ग्रामपंचायत आणि परिसरात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (ncp) समर्थकांचा जल्लाेष सुरु आहे.

नाशिकच्या कळवण ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा पाहायला मिळाला. या ठिकाणी 22 पैकी 10 ग्रामपंचयतीच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

सात ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे थेट सरपंच निवडून आले आहेत. तसेच पाच जागांवर अपक्षाची सरशी झाली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लाेष केला आहे. दरम्यान कळवणमध्ये भाजपला साधे खातेही उघडता आले नाही.

gram panchayat election result
gram panchayat election resultsaam tv

कळवण येथे 22 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. रविवारी एकूण 19 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी.गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दहा ठिकाणी राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.

Edited By : Siddharth Latkar

ncp , gram panchayat election result 2022 , nashik, kalvan
'माझ्या मागं एकनाथ अन् देवेंद्र आहेत, मी काेणाला घाबरत नाही'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com